स्वानंद सुखनिवासी ब्रहमीभुत वैकुंठवासी श्रीगुरूराज धोंडोपंत महाराज भोसेकर हे विसाव्या शतकातील श्रीगुरूकृपेचे साक्षीत्व सिद्ध करणारे महान संत होत.

भारतवर्षामध्ये भागवतधर्मात अनेक सांप्रदाय परंपरा आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने ‘हिंचगेरी’ सांप्रदायाचाही समावेश होतो. हिंचगेरी सांप्रदायामध्ये स.स.काडसिध्देश्वर महाराज स.स. श्रीगुरूलिंगजंगममहाराज ,स.स. रघुनाथप्रियमहाराज स.स.भाऊसाहेब महाराज उमदी, स.स.सिदधरामेश्वर महाराज पाथरी, स.स.अंबुराव महाराज, स.स.गिरीमल्लेश्वर महाराज, स.स.सिद्धलिंगाय्यास्वामी महाराज, श्रीगुरूदेवरानडेमहाराज, स.स. विलासानंद महाराज, स.स.पोरेडीवकील, स.स.मलकाण्णा महाराज, स.स. गणपतराव महाराज कन्नुर व वैकुंठवासी श्रीगुरूराज धोंडोपंतमहाराज भोसेकर इत्यादी महान विभुती होऊन गेल्या.

भोसे(श्रीक्षेत्र पंढरपुर जि.सोलापुर महाराष्ट्र) येथे जन्मलेल्या वै.श्रीगुरूराज धोंडोपंतमहाराजांचा कृषी व्यवसाय करीत असताना श्रीक्षेत्रपंढरपुर येथे अनेक महान विभुतींचा सत्संग घडला. प्रवचन किर्तनाचा श्रवणलाभ घडला. दुष्काळामुळे वै.महाराजांना उपजिविकेसाठी उदरनिर्वाहाच्या निमित्ताने सोलापुर येथे स्थायिक व्हावे लागले. जुनीमिल सोलापुर येथे नोकरी करीत असताना संत वाडःमयाचे वाचन श्रवण चिंतनाच्या आवडीमुळे हिंचगेरी सांप्रदायातील श्रीसमर्थ सदगुरू सिद्धरामेश्वरमहाराज यांचा कृपाशिर्वाद झाला, श्रीसदगुरूंचा सहवास घडला. सांप्रदायिक साधना,नित्यपाठ, श्रीगुरूची अन्यन्यभक्ती नामचिंतन अश्याप्रकारे दोन तपे अखंड साधना केल्यानंतर श्रीसदगुरूंचा आज्ञेने संपूर्ण आयुष्य जडजीवांचा उद्धार करण्याकरिता वेचले.

सोलापुर येथे सदगुरू भक्तीमंदीर (रेल्वेलाईन)स्थापन केले. श्रीसदगुरूंचा पायी माघवारी पालखी सोहळा सोलापुर ते पंढरपुर सुरू केला. संपुर्ण भारतवर्षामध्ये श्रीगुरूभक्तीचा महिमा वाढविला. हिंचगेरी व वारकरी सांप्रदायामध्ये समन्वय साधुन श्रीगुरू व देव एकच असल्याची प्रचिती दिली. वै.महाराज प्रवचनातुन प्रबोधन करीत असत. हिंचगेरी सांप्रदायातील ते आद्य किर्तनकारही होते. त्यांनी समाजातील सर्व घटकांचा उध्दार केला.

सदगुरू सेवाधाम श्रीक्षेत्रपंढरपुर, सदगुरू भक्ती मंदीर सोलापुर, सदगुरू भक्ती मंदीर नागपुर, सदगुरू दर्शनधाम, पेनुर(मोहोळ सोलापुर), सदगुरूभक्तीमंदीर रोपळे (माढा सोलापुर) इत्यादी ठिकाणी वै.महाराजांचे समाधीस्थान आहे. माघवारीत संपूर्ण भारतवर्षातुन "राजाधिराज श्रीसदगुरूनाथ धोंडोपंत महाराज की जय" असे म्हणत लाखो भक्तगण श्रीगुरूंची वारी पंढरीरायास पोहचविण्यास आजही येत असतात. वै.महाराजांच्या नंतर त्यांच्या धर्मपत्नी मातोश्री शेवंताबाई भोसेकर यांनीही वै.महाराजांच्या कार्याचा प्रसार केला. वै.धोंडोपंत महाराजांच्या कार्याचा व परमार्थमार्गाचा प्रसार त्यांच्या वंशपरंपरा व शिष्यपरंपरा करीत आहेत. श्री सद्‍गुरु आबासाहेब धोंडोपंत महाराज भोसेकर व श्रीसदगुरू भाऊसाहेब धोंडोपंत महाराज भोसेकर हे वंशपरंपेने अधिकारी आहेत.